औषधांच्या दुष्परिणामाने उगविले चक्क जिभेवरच केस!

tounge
अमेरिकेमध्ये मिसुरी प्रांतामध्ये राहणाऱ्या एका महिलेच्या गाडीला अपघात होऊन त्यामध्ये ही महिला देखील जखमी झाली. अपघाताच्या नंतर या जखमी महिलेला ताबडतोब रुग्णालयामध्ये भरती केले जाऊन तिच्यावर तातडीने उपचार सुरु करण्यात आले. उपचार सुरु केल्यानंतर या महिलेच्या एका पायाला जबरदस्त दुखापत झाली असल्याचे डॉक्टरांच्या लक्षात आल्याने त्यामध्ये जीवाणूंचा संसर्ग होऊन इन्फेक्शन होऊ नये या करिता डॉक्टरांनी त्वरित काही अँटीबायोटिक्स या महिलेला दिली.
tounge1
उपचार पूर्ण झाल्यानंतर महिलेला इस्पितळातून घरी जाऊ देण्यात आले. मात्र त्यानंतर काही दिवसांनी या महिलेला अचानक अस्वस्थ वाटू लागले आणि तिच्या तोंडाची चव संपूर्णपणे गेली. याची अधिक तपासणी केली गेल्यानंतर या महिलेच्या जिभेवर लहान लहान केस उगविल्याचे निष्पन्न झाले. तसेच अपघात झाल्यानंतर केल्या गेलेल्या उपचारांच्या दरम्यान वापरल्या गेलेल्या अँटीबायोटिक्सच्या विपरीत परिणामांच्या मुळे महिलेच्या जिभेवर केस उगविले असल्याचे निदान करण्यात आले.
tounge2
जिभेवर केस उगविण्याच्या या समस्येला वैद्यकीय भाषेमध्ये ‘लिंगस व्हीलोसा नायग्रा’ असे म्हटले जाते. या अवस्थेमध्ये रुग्णाच्या जीभेवर एक ते अठरा मिलीमीटर लांबीचे केस उगवू शकतात. तसेच तोंडाच्या आतमध्ये स्व्च्छता न ठेवल्यास, तंबाखू चघळल्यास किंवा धूम्रपान केल्यास ही समस्या आणखी बळावते असे वैज्ञानिक म्हणतात. सुदौवाने या समस्येवर उपचार करता येणे शक्य असल्याने तसे औषधोपचार केल्यानंतर या महिलेची समस्या लवकरच दूर झाली.

Leave a Comment