असे खरेच घडते काय?

fact
आजकाल माहिती मिळविण्याची किंवा देण्याची माध्यमे पुष्कळच वाढली आहेत. त्यातून इंटरनेट आता अगदी हाताशी असल्याने एखाद्या गोष्टीची सत्यासत्यता पडताळून पाहणे देखील किती राती सोपे झाले आहे. पण काही गोष्टींच्या बाबतीत हे तत्व लागू पडत नाही. अनकेदा एखादी गोष्ट आपण ऐकतो, किंवा एखाद्याला करताना पाहतो, तेव्हा त्यामागचे कारण किंवा तथ्य जाणून न घेता, त्या गोष्टीचे अनुकरण आपण करू लागतो. आपल्याही नकळत आपला त्या गोष्टीवर विश्वास बसू लागतो. पण आपण जे ऐकले, किंवा जी गोष्ट आपण नियमाने करतो, त्यामध्ये कितपत तथ्य आहे हे जाणून घेण्याची किंवा त्याची पडताळणी करून पाहण्याचा प्रयत्न केला जात नाही.
fact1
मोबाईल फोन किंवा लॅपटॉपची बॅटरी पूर्णपणे डीस्चार्ज झाल्याखेरीज ती पुन्हा चार्ज करू नये, व असे केल्याने बॅटरी जास्त काळ टिकते असे सांगितले जाते. पण वास्तविक मोबाईल फोन्स किंवा लॅपटॉप्स मध्ये वापरल्या जाणाऱ्या लिथियम आयॉन बॅटरिज कमी वापराने आणि संपूर्णपणे डिस्चार्ज होण्यापूर्वीच चार्ज केल्याने जास्त काळ टिकून राहतात. जेव्हा बॅटरी पूर्णपणे डिस्चार्ज केल जाऊ पुनश्च चार्ज केली जाते, तेव्हा ती पूर्ण क्षमतेइतकी चार्ज न होण्याची शक्यता जास्त असते. बाजारामध्ये नव्याने आलेल्या मोबाईल फोन्सच्या तंत्रज्ञानामध्ये ही समस्या पुष्कळ अंशी कमी असली, तरी काही जुन्या मोबाईल फोन्सच्या बाबतीत हे तथ्य लागू पडते.
fact2
पृथ्वी गोल आहे हे तथ्य कोलंबसने सिद्ध केले असून, अमेरिकेचा शोधही कोलंबसनेच लावला असे सांगितले जाते. अमेरिकेचा शोध कोलंबसने १४९२ साली लावला हे जरी खरे असले, तरी पृथ्वी गोलाकार आहे हे तथ्य मात्र कोलंबसने सिद्ध करण्यापूर्वी किती तरी शतके आधीपासूनच शास्त्रज्ञांना अवगत होते. पृथ्वी गोलाकार असल्याची अनेक शास्त्रीय निरीक्षणे सहाव्या शतकामध्ये देखील नोंदविली गेली आहेत. त्यामुळे कोलंबसने हे तत्व जगापुढे मांडण्याआधीच पृथ्वी गोलाकार आहे हे तथ्य सर्वश्रुत होते.
fact3
ऊंटाला ‘वाळवंटातील जहाज’ म्हटले जाते, कारण ऊंट अनके तास पाण्याच्या विना किंवा चारा न खाता राहू शकतो. ऊंटाने प्यायलेले पाणी त्याच्या पाठीवरील उंच भागामध्ये साठविले जाते असे सांगितले जाते. पण यामध्ये तथ्य नाही. ऊंटाच्या पाठीवरील उंचवटा खरेतर चरबीने (फॅटी टिश्यू)ने बनेलेला असतो. या चरबीमुळे उंटाच्या शरीराला पोषण मिळते आणि त्यामुळेच ऊंट काही न खाता, किंवा पाणी न पिता अनेक तास प्रवास करू शकतो. या फॅटी टिश्यूमधील उर्जा वापरली गेली की हा उंचवटा कमी होतो. जेव्हा ऊंट चारा खातो व पाणी पितो तेव्हा हा उंचवटा पूर्ववत दिसू लागतो.

Leave a Comment