मासिकपाळीची तारीख का होते मागे-पुढे ?

date
मुंबई : मासिकपाळी ही महिलांच्या आरोग्यासाठी एक महत्त्वाची भूमिका पार पाडत असते. मासिकपाळीचे दिवस महिलांसाठी त्रासदायक असले तरीही वयाच्या विशिष्ट टप्प्यावर ती महिलांसाठी फार आवश्यक असते. हार्मोन्सच्या पातळीमध्ये या काळात चढउतार होतात.

आहारदेखील महिलांच्या शरीरातील हार्मोन्सच्या पातळीमध्ये बिघाड होण्यामागे महत्त्वाची भूमिका पार पाडतो. एका अभ्यासानुसार, कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण ज्या महिलांच्या आहारात अधिक असते त्यांच्यामध्ये मासिकपाळी वेळेआधी येण्याची शक्यता अधिक असते.

ब्रिटनमधील युनिव्हर्सिटी ऑफ लीड्स यांच्या एका प्रयोगात ९१४ महिलांवर प्रयोग करण्यात आला होता. ज्या महिलांच्या आहारात मासे, बींस यांचे सेवन अधिक असते त्यांच्यामध्ये मासिकपाळी उशिरा येते. काही तज्ञांच्या माहितीनुसार, केवळ आहारावर मासिकपाळी ही अवलंबून नसते. आहारासोबतच इतर अनेक घटकांचा मासिकपाळीवर परिणाम होत असतो.

याबाबत स्टडी जर्नल ऑद एपिडिमीलॉजी अ‍ॅन्ड कम्युनिटी हेल्थमध्ये छापण्यात आलेल्या माहितीनुसार, अनेक प्रश्न महिलांना त्यांच्या आहाराबाबत विचारण्यात आले. त्यानुसार फळदार भाज्या अधिक खाणार्‍यांमध्ये मासिकपाळी उशिरा आल्याची दिसून येते. हा उशिर सुमारे एक ते दीड वर्षांचा असू शकतो. फळांमध्ये अ‍ॅन्टीऑक्सिडंट घटक असल्याने मासिकपाळीमध्ये उशीर होऊ शकतो. कार्बोहायड्रेटयुक्त आहारामुळे मुलींमध्ये एक ते दीड वर्ष आधी मासिकपाळी सुरू होते.

याबाबत संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार, आहारासोबतच मासिकपाळीवर महिलांचे वजन, प्रजनन क्षमता आणि एचआर्टी हार्मोन देखील प्रभावी ठरतात. मासिकपाळीवर अनुवंशिकतेचाही थेट परिणाम होतो. माश्याच्या तेलामध्ये प्रामुख्याने ओमेगा 3 फॅटी अ‍ॅसिड आढळते. यामुळेही शरीरात अ‍ॅन्टिऑक्सिडंटचे प्रमाण वाढते. सेक्स हार्मोन्सही शरीरात प्रभावित होतात. यामुळे एस्ट्रोजनची पातळी वाढते. त्यामुळे मासिकपाळी प्रभावित होते. ती वेळेआधी येण्याची शक्यता वाढते.

संशोधकांच्या अभ्यासानुसार मासिकपाळी ज्या महिलांमध्ये वेळेच्या आधी सुरू होते अशांमध्ये हाडांचे विकार, हृद्यविकारांचा धोका बळावतो. तर मासिकपाळी उशिरा सुरू झालेल्यांमध्ये ब्रेस्ट कॅन्सर, गर्भाशयाच्या कॅन्सरची शक्यता अधिक बळावते.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment