हँड सॅनिटायझर वापरणे संपूर्णपणे सुरक्षित आहे का?

hand
आजच्या काळामध्ये तंत्रज्ञान वाढले, सोयी वाढल्या, आणि त्याचबरोबर निरनिराळे आजार उद्भविण्याची कारणे ही वाढली. अनेक तऱ्हेच्या बॅक्टेरिया आणि व्हायरस यांच्या संक्रमणामुळे निरनिराळ्या व्याधीही उद्भवू लागल्या आहेत. या व्याधींचा संसर्ग होण्यापसून आपला बचाव करण्यासाठी स्वच्छता आणि हात निर्जंतुक असणे हा सर्वोत्तम पर्याय आहे, हे आपण जाणतोच. आजकाल हात निर्जंतुक करण्यासाठी हँड सॅनिटायझर सर्रास वापरले जात असतात. पण हे हँड सॅनिटायझर वापरणे खरोखरच कितपत योग्य आहे, हा मुद्दा विचार करण्याजोगा आहे.
hand1
मेलबर्न विद्यापीठाने केलेल्या रिसर्च मध्ये करण्यात आलेल्या निदानानुसार बहुतेक हँड सॅनिटायझर्समध्ये अल्कोहोल असून, हे अल्कोहोल हातांवरील
बॅक्टेरियाचे रुपांतर ‘सुपर बग्स’मध्ये करीत असते. हे सुपर बग्स अतिशय प्रभावशाली अँटी बायोटीक्सनाही दाद देत नाहीत. याचे मुख्य कारण, अल्कोहोल बेस्ड हँड सॅनिटायझरचा अतिवापर हे आहे. हँड सॅनिटायझर अतिप्रमाणात वापरल्याने हातांवरील किटाणू सॅनिटायझरच्या प्रभावाला बळी पडत नाहीत, आणि ‘इम्यून’ होऊन जातात. त्यामुळे हात निर्जंतुक करण्यासाठी वापरण्यात येणारे हँड सॅनिटायझर हे हातांवरील किटाणू संपूर्णपणे नष्ट करू शकत नाहीत. म्हणून हात निर्जंतुक करण्यासाठी हँड सॅनिटायझर न वापरता साबण आणि पाण्याने स्वच्छ धुणे हा सर्वोत्तम पर्याय असल्याचे वैज्ञानिक म्हणतात.
hand2
जर अल्कोहोल टाळण्यासाठी कमी अल्कोहोलचे प्रमाण कमी असलेला सॅनिटायझर निवडला, तर यामध्ये ट्रायक्लोसॅनचे प्रमाण अधिक असते. हे एक अतिशय प्रभावी अँटीबॅक्टेरियल एजंट असून, याच्या दैनंदिन वापरामुळे शरीराची नैसर्गिक रोगप्रतिकारशक्ती कमी कमी होऊन, सर्दी पडश्यासारखे किरकोळ आजारही अगदी सहज ग्रासू शकतात. तसेच सॅनिटायझरच्या सतत वापराने हातांची त्वचा शुष्क, रखरखीत होऊ शकते. त्यामुळे वारंवार हँड सॅनिटायझर वापरण्याची सवय असेल, तर हातांची आर्द्रता टिकवून ठेवण्यासाठी चांगल्या प्रतीचे हँडक्रीम किंवा मॉईश्चरायझर अवश्य वापरावे.
hand3
अनेक सॅनिटायझर्समध्ये ‘phthalates’ असतात, जे आरोग्याच्या दृष्टीने अपायकारक ठरू शकतात.याचा वास घेतल्याने देखील हे शरीरामध्ये अवशोषित होऊ शकतात. याचा सर्वात जास्त अपाय प्रजननशक्तीला होऊ शकतो. सॅनिटायझर्स हातावरील ‘बॅड’ बॅक्टेरियाच्या सोबत, ‘गुड’ बॅक्टेरियाही नष्ट करतात. त्यामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती खालावते. त्यामुळे हँड सॅनिटायझरचा वापर केवळ जिथे साबण आणि पाणी उपलब्ध नाही, अश्या ठिकाणी केला जाणे योग्य ठरेल.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment