सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे ‘गंदी बात 6’ चा ट्रेलर


पुन्हा एकदा ‘गंदी बात’ ही वेब सीरिज अल्ट बालाजी या ओटीटी प्लॅटफॉर्मवर एकता कपूर घेऊन येत आहे. बोल्ड सीन्ससाठी ‘गंदी बात’ ही सीरिज विशेष ओळखली जाते. लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला या सीरिजचा ६वा सीझन येणार आहे. ‘गंदी बात 6’ चा ट्रेलर नुकताच रिलीज करण्यात आला असून सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

‘गंदी बात 6’ चा ट्रेलर अल्ट बालाजीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. ट्रेलरच्या सुरूवातीला, आपल्याला वय विचारले जाते. या सीझनमध्ये तडका देण्यासाठी मर्डर मिस्ट्री दाखवण्यात आली आहे. लाखो लोकांनी या सीरिजचा ट्रेलर पाहिला असून पडद्याच्या मागेच सगळे रहस्य दडलेले आहेत. तर जागृत राहा कारण यंदाच्या सीझनमध्ये प्रेम, लोभ, धोका, खून आणि सस्पेंस भरपूर असणार असल्याचे कॅप्शन त्यांनी ट्रेलर शेअर करत दिले आहे.


ही सीरिज पहिल्या सीझनपासूनच चर्चेत राहिली आहे. प्रत्येक सीझनला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. आता ‘गंदी बात ६’चा ट्रेलर पाहून चाहत्यांमध्ये सीरिजबाबतची उत्सुक वाढली आहे. महिमा गुप्ता ‘गंदी बात 6’ मध्ये मुख्य भूमिका साकारणार आहे. महिमा सोबत अलिशा खान, केवल दिसाणी, निधी महवन, शिवम मेहता आणि मोहित शर्मा हे कलाकार देखील दिसणार आहेत.

आज ‘गंदी बात 6’ अल्ट बालाजी या ओटीटी प्लॅटफॉमवर रिलीज करण्यात येणार आहे. तर ‘गंदी बात 4’ या सीझनमध्ये एका सीनमध्ये भारतीय सेनेच्या गणवेशाचा अपमान केल्याचा आरोप करण्यात आला होता. यावर भारतीय सेनेनेही निषेध नोंदविला होता.