शक्ती कायद्यासंदर्भात मुंबईतील महिला व वकील संघटनांकडून महत्त्वपूर्ण सूचना


मुंबई : शक्ती कायद्यासंदर्भात विधानभवन येथे संयुक्त समितीसमोर मुंबईतील विविध महिला संघटना तसेच वकील संघटनांकडून महत्त्वपूर्ण सूचना व निवेदने प्राप्त झाली असून समितीच्या बैठकीत त्यावर सविस्तर चर्चा होईल, असे या संदर्भातील समितीचे अध्यक्ष तथा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले.

या बैठकीस उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांची विशेष उपस्थिती होती. तसेच महिला व बालकल्याणमंत्री यशोमती ठाकूर, अपर मुख्य सचिव (गृह) सिताराम कुंटे तसेच विधिमंडळ प्रधान सचिव राजेंद्र भागवत व इतर सदस्य उपस्थित होते.

मुंबईतील जवळपास 46 महिला व वकील संघटनांकडून सूचना, निवेदने प्राप्त झाली होती. त्यांच्या प्रतिनिधींनी समितीसमोर सूचना मांडल्या. या समितीची पुढील बैठक औरंगाबाद येथे 30 जानेवारी, 2021 रोजी होणार असून त्याठिकाणीदेखील महिला व वकील संघटनांकडून सूचना व निवेदने स्वीकारली जाणार असल्याचे गृहमंत्री देशमुख यांनी सांगितले.