म्युझिक अल्बमसाठी 51 वर्षीय जेनिफर लोपेझने ओलांडल्या सर्व सीमा


नुकताच आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रसिद्ध गायिका जेनिफर लोपेज हिचा नवीन म्युझिक अल्बम रिलीज करण्यात आला आहे. जेनिफर या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा तिच्या सर्व चाहत्यांना प्रभावित केले आहे. वास्तविक महिनाभरापूर्वी, या गाण्याचे लिरिक्स व्हर्जन जेनिफरने रिलीज केले होते, जे अनेकांना खूप आवडले होते. ज्यानंतर आता तिने त्याचा म्युझिक व्हिडिओ समोर आणला आहे. जेनिफर ज्यामध्ये एंजेलच्या रुपात दिसत आहे. जेनिफरने या व्हिडिओमध्ये सिफ विंग्स घातले आहेत, त्याशिवाय तिने काहीच कपडे घातलेले नाही. जेनिफरची व्हिडिओमधील हॉट फिगर कुणाचेही होश उडवेल अशीच आहे.

जेनिफरचा हा म्युझिक अल्बम समोर येताच तो तूफान व्हायरल झाला आहे . या गाण्यावर तिचे चाहते खुप प्रेम करत आहेत. तिचे हे गाणे एवढ्या कमी वेळात 13 लाखाहून अधिक लोकांनी पाहिले आहे.आणि अनेकांना ते खूप आवडत आहे. जेनिफरचे हे गाणे नात्यावर आधारित आहे. ज्याद्वारे असे सांगितले गेले आहे की, इतर कोणत्याही व्यक्तीला आपण बदलू शकत नाही. आपण एखाद्यास बदलू शकत असल्यास ते स्वतःहा आहोत. अशा परिस्थितीत आपण नात्यातून बाहेर पडायला हवे जर समोरच्याला त्याचे महत्त्व नसेल तर.