शंखनाद करणे आरोग्याच्या दृष्टीने लाभकारी

shankh
शंख देवघरात असणे, हे शुभ समजले जाते. तसेच पूजेच्या वेळी केला जाणारा शंखध्वनी हा ही सकारात्मक उर्जा संचालित करणारा समजला जातो. पण शंख केवळ सकारात्मक लहरी निर्माण करणाराच नाही, तर शंख निनाद करण्याचे थेट फायदे आपल्या आरोग्यालाही होतात. तसेच शंखामध्ये पाणी काही वेळ भरून ठेऊन त्या पाण्याचे सेवन केल्याने त्वचेचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते.
shankh1
शंख वाजविण्याच्या क्रियेमुळे चेहऱ्याचे स्नायू ताणले जाऊन त्यांना व्यायाम मिळतो. त्यामुळे चेहऱ्यावरील अतिरिक्त चरबी घटून चेहरा जास्त सुंदर, रेखीव दिसू लागतो. तसेच शंख वाजविण्याच्या या क्रियेमुळे चेहऱ्यावरील सूक्ष्म रेषा आणि सुरकुत्याही घटण्यास मदत होते. शंखनिनाद मानसिक तणाव कमी कारण्यास सहायक आहे. या निनादामुळे मेंदूकडे जाणारा रक्तप्रवाह सुरळीत होतो. मेंदूमध्ये रक्ताचा भरपूर संचार झाल्याने मेंदू शांत राहतो. स्ट्रेस लेव्हल नियंत्रित ठेवण्यासाठी शंख वाजविणे फायद्याचे म्हटले जाते.
shankh2
शंख वाजविण्याच्या क्रियेचा थेट परिणाम शरीराच्या रेक्टल मसल्सवर ही होतो. त्यामुळे शरीराच्या आतील स्नायूंना योग्य व्यायाम मिळून त्यामुळे पोटामध्ये गॅसेस होण्याच्या समस्येमध्ये आराम पडतो. शंख वाजविण्याची क्रिया फुफ्फुसांसाठी देखील अतिशय उपयोगी आहे. शंख वाजविल्याने फुफ्फुसांना चांगला व्यायाम तर मिळतोच, शिवाय ज्यांना श्वसनासंबंधी तक्रारी असतील, त्यांच्यासाठी देखील शंख वाजविणे उपयुक्त म्हटले गेले आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment