आईस्क्रीममधूनही होऊ शकतो कोरोनाचा फैलाव: चीनमध्ये भीतीची लाट


बीजिंग: कोरोनासंदर्भात सतत काही नवनवे खुलासे होत आहेत. अशीच एक माहिती उघड झाली आहे की आईस्क्रीममध्ये कोरोनाचा विषाणू शकतो आणि ते खाणाऱ्याला त्याचा फैलावही होऊ शकतो. या चीनमध्ये पुन्हा एकदा भीतीची लाट उसळली आहे.

तियानजिन महापालिका क्षेत्रात आईस्क्रीमच्या तीन दुकानातून तपासणीसाठी घेतलेल्या नमुन्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग असल्याचे आढळून आले आहे. तियानजीन मधील डाकियादो फूड कंपनीकडे असलेया आईस्क्रीमच्या तब्बल एक हजार आठशे खोक्यांमध्ये कोरोना संक्रमित आईसक्रीम आढळून आले. त्यापैकी काहीशे आईस्क्रीमची विक्रीही झाली आहे.

प्रकल्पातील १ हजार ६६२ कर्मचाऱ्यांना विलगीकरणात ठेवण्यात आले असून या सर्वांची कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. यूनिवर्सिटी ऑफ लीड्स च्या विषाणूविज्ञान विभागाचे शास्त्रज्ञ डॉ. स्टीफन ग्रिफिन यांनी कोरोनाचा विषाणू आईसक्रीम उत्पादनाच्या यंत्रमुग्रीमध्येही कोरोना असण्याची शक्यता वर्तविली आहे.