कोरोनाचे संपूर्ण उच्चाटन अशक्य: जागतिक आरोग्य परिषदेचा इशारा


जिनेव्हा: कोरोनाला प्रतिबंध करणाऱ्या लसी विकसित झाल्या असल्या तरीही जगभरातून कोरोनाचे समूळ उच्चाटन ही अशक्य कोटीतील बाब आहे, असा इशारा जागतिक आरोग्य परिषदेने दिला आहे. विषाणूला पायबंद घालण्यासाठी आगामी १०० दिवसात सर्व देशांनी लसीकरण मोहीम राबवावी, अशी अपेक्षाही परिषदेने व्यक्त केली आहे.

कोरोना विषाणूच्या नव्या ‘अवतारा’बाबत चर्चा करण्यासाठी जागतिक आरोग्य परिषदेने तज्ज्ञांची बैठक अयोहित केली होती. मात्र, सविस्तर चर्चा करणे यासाठी ही चर्चा पुढे ढकलण्यात आली आहे.

तापुढील काळात कोविड- १९ च्या रुग्णांची संख्या शून्यावर येणे शक्य नसल्याचे परिषदेने नमूद केले आहे. कोरोनाच्या बळींची जगभरातील संख्या २० लाखांवर पोहोचली आहे.