मुंबई – धनंजय मुंडे यांच्यावर झालेल्या बलात्काराच्या आरोपांनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सध्या विरोधकांच्या निशाण्यावर आहे. धनंजय मुंडे यांनी झालेल्या आरोपांनंतर शरद पवारांची भेट घेऊन प्रकरणाची सविस्तर माहिती दिली. तक्रार गंभीर असून पक्षातील नेत्यांशी चर्चा केल्यानंतर निर्णय घेतला जाईल, असे शरद पवारांनीही म्हटले आहे. यादरम्यान पोलीस अधिकाऱ्यांची शरद पवारांनी भेट घेतल्याच्या वृत्तावर भाजप नेते अतुल भातखळकर यांनी टीका केली आहे.
घरी बसलेल्या मुख्यमंत्र्यांना नारळ देऊन शरद पवारांनी सत्तेची सूत्रे हाती घ्यावी – भातखळकर
पोलिस अधिकाऱ्यांनी शरद पवारांसोबत चर्चा करायला ते राज्याचे गृहमंत्री आहेत की मुख्यमंत्री? राज्यात कोणतेही अधिकार पद नसलेल्या पवारांशी चर्चा करणाऱ्या या पोलीस अधिकाऱ्यांची हकालपट्टी करावी अशी मागणी मी कॅबिनेट सचिवांकडे करणार आहे. https://t.co/MRgK3g4E7g
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) January 14, 2021
शरद पवारांसोबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही अतुल भातळखकर यांनी ट्विट करत निशाणा साधला आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी शरद पवारांसोबत चर्चा करायला ते राज्याचे गृहमंत्री आहेत की मुख्यमंत्री? राज्यात कोणतेही अधिकार पद नसलेल्या पवारांशी चर्चा करणाऱ्या या पोलीस अधिकाऱ्यांची हकालपट्टी करावी अशी मागणी मी कॅबिनेट सचिवांकडे करणार असल्याचे अतुल भातखळकर यांनी म्हटले आहे.
पाठी मागून सूत्र हलवण्यापेक्षा घरी बसलेल्या मुख्यमंत्र्यांना नारळ देऊन शरद पवारांनी सत्तेची सूत्रे हाती घ्यावी… https://t.co/MRgK3g4E7g
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) January 14, 2021
त्याचबरोबर पाठीमागून सूत्र हलवण्यापेक्षा घरी बसलेल्या मुख्यमंत्र्यांना नारळ देऊन शरद पवारांनी सत्तेची सूत्रे हाती घ्यावी,” असा उपहासात्मक सल्लाही अतुल भातखळकर यांनी दिला आहे.