अमेरिकेच्या इतिहासातील महाभियोगाची दोनदा कारवाई होणारे डोनाल्ड ट्रम्प पहिलेच राष्ट्राध्यक्ष


वॉशिंग्टन – अमेरिकेमध्ये आठवड्याभरापूर्वी कॅपिटॉल हिलमध्ये राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांनी केलेल्या हिंसाचाराप्रकरणी त्यांच्या विरूद्ध महाभियोगाचा प्रस्ताव जारी करण्यात आला आहे. सत्तेवर असताना एकाच कारकीर्दीमध्ये अमेरिकेत दोनदा एखाद्या राष्ट्राध्यक्षाविरूद्ध महाभियोग आणण्याचा ही पहिलीच घटना आहे. दरम्यान 232 लॉ मेकर्स मध्ये 10 रिपब्लिकन पक्षाच्या लोकांनी देखील महाभियोगाला पाठिंबा देत प्रस्ताव मंजूर केला आहे. हा महाभियोग प्रस्ताव दोन्ही सभागृहात मंजूर झाल्यास डोनाल्ड ट्रम्प यांना मुदतपूर्वच सत्तेवरून पायउतार व्हावे लागणार आहे. हा प्रस्ताव सध्या कनिष्ट सभागृहात मंजुर झाला आहे. तो सिनेटमध्येही मंजूर झाल्यास ट्रम्प यांना मुदतपूर्व पद सोडावे लागणार आहे.

कॅपिटॉल हिल येथील हिंसाचार ही अमेरिकेच्या इतिहासात अत्यंत क्लेषदायक घटना होती. जगभरातून त्याचा निषेध करण्यात आला. एकीकडे ट्रम्प यांच्याविरूद्ध आज महाभियोग प्रस्ताव मंजुर होत असताना दुसरीकडे त्यांनी एक विशेष व्हिडिओ प्रसारित करत कोणत्याही प्रकारच्या राजकीय हिंसाचाराची आपण पाठराखण करत नाही. कायद्याचे अमेरिकेत राज्य आहे. मागील आठवड्यात कॅपिटॉल हिंसाचारामध्ये ज्यांचा सहभाग होता, त्यांच्यावर कठोर कारवाई होईल, असे देखील ट्रम्प म्हणाले आहेत.

महाभियोग प्रस्ताव आल्यानंतर आपली प्रतिक्रिया देताना अमेरिकेच्या हाऊस स्पिकर नॅन्सी पलोसी यांनी कायद्यापेक्षा कुणीही मोठे नाही. राष्ट्राध्यक्ष देखील त्याला अपवाद नसल्याची प्रतिक्रिया दिली आहे. ट्रम्प यांच्याविरोधात यापूर्वी फेब्रुवारी 2020 मध्ये महाभियोग प्रस्ताव आणण्यात आला होता. त्यांच्यावर त्यावेळेस 2 आरोप होते. पहिला, युक्रेनवर 2020 च्या निवडणूकीसाठी ट्रम्प यांच्या विरोधात उभे राहणारे, जो बायडेन यांना बदनाम करण्यासाठी दबाब आणला होता. दुसर्‍या आरोपात असे म्हटले आहे की, ते काँग्रेसला अडथळा आणत होते. पण त्यावेळेस त्यांना क्लिन चीट मिळाली होती.