आपला पदाचा राजीनामा देऊ शकतात धनंजय मुंडे


मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसला पक्षाचे दिग्गज नेते धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप झाल्याने मोठा धक्का बसला आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस धनंजय मुंडे यांच्यावर काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असतानाच धनंजय मुंडे आपला पदभार सोडण्याची शक्यता आहे. मुंडे यांच्यावरील आरोप हे गंभीर स्वरुपाचे असल्याचे शरद पवार यांनी देखील म्हटल्यामुळे त्यांची राजीनामा देण्याची शक्यता वाढली आहे. याबाबत सर्व सदस्यांची मते जाणून घेतल्यानंतर लवकरात लवकर निर्णय घेऊ. पक्ष आणि पक्षप्रमुख म्हणून निर्णय घेणार, कोणावर अन्याय होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. असे शरद पवार यांनी म्हटले आहे.

पक्ष कार्यालयात येऊन सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे हे राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सुरु आहे. मुंडे यांच्यावर झालेल्या आरोपामुळे त्यांच्यावर राजीनाम्याचा दबाव वाढला असल्यामुळे त्यांच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे. धनंजय मुंडे यांनी तत्पूर्वी शरद पवार यांची भेट घेतली होती. धनंजय मुंडे यांचा राजीनामा आज संध्याकाळपर्यंत घेतला जाईल, अशी चर्चा आहे.

शरद पवारांना भेटून मी याआधी सगळी माहिती दिली आहे. सगळ्यांसमोर मी माझे व्यक्तीगत म्हणणे मांडलेले आहे. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि पक्षाचे नेतृत्व करणारे नेते निर्णय घेतील, अशी प्रतिक्रिया धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादी कार्यालयात आल्यावर दिली आहे. धनंजय मुंडे यांच्यावर बलात्कार आरोप करण्यात आला आहे. या नंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. धनंजय मुंडे यांनी यानंतर केलेल्या या पोस्टनंतर हा विषय आणखी चर्चेत आला. भाजपने या आरोपामुळे मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. त्यामुळे धनंजय मुंडे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.