मुंबई – राज्य मानवी हक्क आयोगाच्या सचिवपदी नागपूर महापालिका आयुक्तपदावरून बदली करण्यात आल्यापासून गेले पाच महिने नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या तुकाराम मुंढे यांची नियुक्ती करण्यात आली. त्याचबरोबर अन्य चार अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या.
तुकाराम मुंढे यांची मानवी हक्क आयोगाच्या सचिवपदी नियुक्ती
गेल्या ऑगस्टपासून तुकाराम मुंढे हे नियुक्तीच्या प्रतीक्षेत होते. प्रशासकीत वर्तुळात मानवी हक्क आयोगातील नेमणूक ही तुलनेत दुय्यम दर्जाची मानली जाते मुख्य सचिव तसेच मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार यांच्यासह वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांबद्दल आक्षेपार्ह भाष्य केल्याने वादाच्या भोवऱ्यात सापडलेले आणि गेल्या काही महिन्यांपासून नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेले अप्पर मुख्य सचिव अरविंद कु मार यांची सहकार विभागाच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली. याशिवाय डी.बी. गावडे यांची सार्वजनिक आरोग्य विभागात सहसचिवपदी तर उदय जाधव यांची राज्य बालहक्क आयोगाचे सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.