विराट अन् अनुष्काच्या मुलीचा फोटो काही मिनिटांत सोशल मीडियावर व्हायरल


सोमवारी टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्माला मुलगी झाल्याचे जाहीर केल्यानंतर मुलीच्या जन्मानंतर अवघ्या काही क्षणांतच सोशल मीडियावर हा विषय ट्रेंडमध्ये आला. मुलीचे नाव ते तिचा पहिला फोटो या साऱ्याबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली होती.


या चिमुरडीचे कोहली कुटुंबात आगमन झाल्याने प्रत्येकजण खूप आनंदित आहे. त्याचबरोबर या निमित्ताने या जोडीचे बॉलिवूड आणि क्रिकेट जगातील अनेक नामवंत सतत अभिनंदन करत असतात. विराट कोहलीचा भाऊ विकास कोहलीने हे फोटो शेअर केले आहे.

मुलगी झाल्यानंतर आता अनुष्का आणि विराट त्यांच्या मुलीचे नाव काय ठेवणार याची उत्सुकता या दोघांच्या फॅन्सना लागली आहे. पण प्रसिध्दी माध्यमांमध्ये तिच्या नावाबाबत एक बातमी आलेली आहे. डीएनएनं दिलेल्या वृत्तानुसार बाबा अनंत महाराज विराट आणि अनुष्काच्या मुलीचे नाव ठेवणार आहेत. विराट आणि अनुष्का हे दोघेही अनंत महाराज यांना प्रचंड मानतात. त्यामुळे याआधी देखील त्यांनी अनेकवेळा त्याच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घडामोडींशी निगडित गोष्टींवर त्यांचा सल्ला घेतलेला आहे.