धनंजय मुंडेंविरोधात मुंबई पोलिसात बलात्काराची तक्रार


मुंबई : राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्या एका महिलेने बलात्काराचा गंभीर आरोप केला आहे. दरम्यान, धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप झाल्याने राज्यातील राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. मुंडे यांच्याविरुद्ध ओशिवारा पोलीस ठाण्यात सदर तरुणीने तक्रार दिल्याची माहिती देखील समोर आली असून, तिच्या तक्रारीची पोलिसांनी देखल घेतली नसल्याचे देखील तिने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

माझ्यावर धनंजय मुंडे यांनी अत्याचार केल्याची माहिती सदर महिने तिच्या ट्विटर अकाऊंटवरून केला आहे. पण पोलिसांनी सदर घटनेची तक्रार नोंदवून घेतली नसल्याचेही तिने म्हटले आहे. दरम्यान राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना देखील सदर महिलेने ट्विट केले आहे. त्याचबरोबर देशाचे पंतप्राधान नरेंद्र मोदी यांनाही ट्विट केले आहे. मुंबई पोलीस, मुंबई पोलीस आयुक्त, सुप्रिया सुळे, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना ट्विटमध्ये टॅग करत मदत करण्याची विनंती देखील केली आहे.

धनंजय मुंडे यांच्यावर सदर महिलेने आरोप करत म्हटले आहे की, २००६ पासून तिच्या इच्छेविरुद्ध अत्याच्यार करण्यात आला आहे. जर तुला गायिका बनायचे असले तर, तर मी बॉलीवूड मधील मोठ्या निर्मात्यांशी भेटून तुला लॉंच करीन असे आमिष देखील दाखवण्यात आल्याचे पीडित महिलेने म्हटले आहे.