‘बर्ड फ्लू’चा धोका लक्षात घेता राज्यात हायअलर्ट घोषित करणे गरजेचे – राजेश टोपे


जालना – जालना येथे आपल्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी बर्ड फ्लू हा आजार अत्यंत धोकादायक असून याचा मृत्यूदर हा १० ते १२ टक्के एवढा असल्यामुळे राज्यात हायअलर्ट घोषित करणे गरजेचे असल्याचे म्हटले आहे.

सध्या देशातील अनेक राज्यांमध्ये बर्ल्ड प्लूने थैमान घातले असून आता त्याचा शिरकाव महाराष्ट्रातही झाला आहे. परभणी जिल्ह्यातील शेकडो कावळे या आजारामुळे मृत्यूमुखी पडले आहेत. सुरुवातीला पक्षांमध्ये संसर्ग होणाऱ्या या आजाराचा मानवी शरीरातही संसर्ग होतो. या आजाराचा मृत्यू दर हा १० ते १२ टक्के एवढा असल्यामुळे या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी पशुसंवर्धन आणि आरोग्य विभागाने अलर्ट घोषित करणे गरजेचे असल्याचे टोपे यांनी म्हटले आहे.