देशात १६ जानेवारीपासून लसीकरणाला सुरूवात: पंतप्रधानांची घोषणा


नवी दिल्ली: जगाला वेठीला धरणाऱ्या कोरोनाच्या विषाणूला प्रतिबंध करण्यासाठी लसीकरण हा एकमेव प्रभावी उपाय असल्याने भारतात लसीकरण प्रक्रिया कधी आणि कशी पार पडणार याची प्रतीक्षा केली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून लसीकरणाच्या प्रारंभाची तारीख जाहीर केली आहे. देशात दि. १६ जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात होणार आहे.

भारतात ‘कोव्हिशिल्ड’ आणि भारतीय बनावटीची ‘कोव्हॅक्सिन’ या लसींना तातडीच्या वापरासाठी मान्यता दिली आहे. लसीकरणाच्या सरावासाठी आणि त्यासाठीची यंत्रणा उभारण्याचा एक भाग म्हणून देशात दोन टप्प्यात ‘ड्राय रान’ मोहीम राबविण्यात आली. आता प्रत्यक्ष लसीकरणाच्या दृष्टीने सर्व नियोजन पूर्ण करण्यात आले आहे.

या नियोजनाचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली महत्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत राज्य सरकारांनी आणि केंद्रशासित प्रदेशांच्या प्रशासनाने लसीकरणाच्या तयारी साठी केलेल्या माहिती घेण्यात आली. या बैठकीलाकेंद्रीय प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात कोरोना संकटाच्या काळात आघाडीवर काम करणारे वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, परिचारिका, पोलीस यांना प्राधान्याने लस देण्यात येणार आहे. या टप्प्यात सुमारे तीन कोटी जणांना लास देण्यात येईल. पुढच्या टप्प्यात ५० वर्षापेक्षा अधिक वयाचे नागरिक आणि इतर प्रकारच्या आजारांचा प्रादुर्भाव असलेल्या ५० वर्षाखालील व्यक्ती यांचा समावेश असणार आहे. ही संख्या सुमारे २७ कोरींपर्यंत असण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.