लसीचा त्वरित पुरवठा करा: ब्राझीलची भारताला विनंती


नवी दिल्ली: कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला आतापर्यंत मोठा विलंब झाला असल्याने भारताने अ‍ॅस्ट्रॅजेनेकाच्या लसीचा त्वरित पुरवठा करावा, अशी विनंती ब्राझीलचे अध्यक्ष जैयर बोल्सनारो यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली आहे.

ब्राझीलच्या लसीकरणाची गती वाढवण्यासाठी आणि विषाणूचा उद्रेक संपविण्यासाठी सर्वच देशांच्या सत्ताधाऱ्यांवर वाढत्या दबाव असताना बोल्सनारो यांनी मोदी यांना लसीची मागणी करणारे पत्र पाठविले आहे. ब्राझीलमध्ये लसीकरणाची गती समाधानकारक नसल्याची भावना निर्माण होत आहे. सामान्य नागरिकांच्या जीवापेक्षा लसीकरण मोहिम प्रादेशिक पुढाऱ्यांचा हितसंबंधांचा विचार करून राबविली जात असल्याचा आरोप केला जात आहे. सरकारवर लसीकरणाची गती वाढविण्यासाठी मोठा दबाव आहे. .

आमच्या राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमानुसार २० लाख डोसच्या त्यासाठी राखून ठेवतानाच ब्राझीललाही लस पुरविण्यात आली तर ही मदत कौतुकास्पद ठरेल, असे बोल्सनारो यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे.