आयुर्वेदामध्ये फुटाण्याचे सेवन हे औषधीसमान मानले गेले आहे. फुटाणे खाणे हे आरोग्याच्या दृष्टीने अतिशय लाभकारी समजले जाते. जर दररोज एक मूठभरून फुटण्याचे सेवन केले गेले, तर त्यामुळे अनेक आजारांचा धोका टाळता येऊ शकतो. हाडांना बळकटी मिळावी, म्हणून अनेक जण अनेक तऱ्हेच्या सप्लीमेंटस्, कॅल्शियम सप्लीमेंटस् घेताना दिसतात. मात्र जर मूठभर फुटाण्यांचा समावेश आपल्या दैनंदिन आहारामध्ये केला गेला, तर शरीराला आवश्यक ते कॅल्शियम यातून मिळेल.
चणे, किंवा हरभरा भारतीय खाद्यसंस्कृतीचा एक महत्वाचा भाग आहे. यामध्ये असलेले लोह, कॅल्शियम, रीबोफ्लावीन, फॉसफोरस, आणि नियासिन ही तत्वे मुबलक मात्रेमध्ये आहेत. रोगांना शरीरापासून दूर ठेवण्यासाठी ही तत्वे शरीराला आवश्यक आहेत. फुटाण्याच्या नियमित सेवनाने शरीरातील घातक तत्वांमुळे कोशिकांचे नुकसान होण्यास आळा बसतो. वजन नियंत्रणामध्ये ठेवण्यासही फुटाण्याचे सेवन चांगले आहे. मधल्या वेळचे खाणे म्हणून, किंवा हलके स्नॅक म्हणून फुटाण्याचा पर्याय चांगला आहे. शरीरातील अतिरिक्त चरबी घटण्यास यामुळे मदत होते.
शरीरामध्ये ग्लुकोजची कमतरता पुरी करण्याकरिताही फुटाणे सहायक आहेत. ब्लड शुगर नियंत्रित ठेवण्याकरिता सकाळी उठल्याबरोबर इतर काही खाण्याआधी फुटाण्याचे किंवा फुटाण्याच्या पीठाचे, म्हणजेच सत्तुचे सेवन करावे. सततच्या शारीरिक श्रमामुळे किंवा मानसिक तणावामुळे मनुष्य वयाआधीच म्हातारा दिसू लागतो. शारीरिक थकवा आणि मानसिक तणाव कमी करणारी तत्वे फुटाण्यामध्ये आहेत. त्यामुळे यांचे सेवन आपल्या आहारामध्ये नियमित असणे अगत्याचे आहे. तसेच यामध्ये असलेल्या तत्वांमुळे अनिद्रेचा विकार दूर होण्यासही मदत होते.
फुटाणे खा, तंदुरुस्त राहा
Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही