लंडनमध्ये ३० जणांपैकी एक कोरोनाबाधित: रुग्णालयात गर्दीची शक्यता


लंडन: ब्रिटनच्या राजधानीमध्ये कोरोनाबाधितांची संख्या वेगाने वाढत असून दर ३० माणसांपैकी एक जण कोरोनाबाधित आहे. महापौर सादिक खान यांनी लंडनमधील रुग्णालयांना अणीबाणीच्या परिस्थितीला सामोरे जाण्याची तयारी ठेवण्याचा इशारा दिला माहे. नवीन विषाणूमुळे कोरोनाव्हायरसच्या संसर्गाच्या वाढीनंतर गर्दी होऊ शकते, असेही त्यांनी नमूद केले आहे.

कोरोनाचा विषाणू आपल्या शहराला संकटाच्या मुखावर उभा करणारा ठरला आहे. याबाबत आपण त्वरित कारवाई केली नाही तर राष्ट्रीय आरोग्य व्यवस्थेवर मोठा ताण निर्माण होईल. आताही मृतांची संख्याही वाढली आहे.

सुमारे ३० एकाला कोरोनाने गाठले आहे. मागील आठवड्यात राजधानीच्या रूग्णालयात रूग्णांची ख्या २७ टक्क्यांनी वाढली आहे आणि व्हेंटिलेटरच्या वापरात तब्बल ४२ टक्क्यांनी वाढ झाली आहे.राजधानीला कोरोना संकटाच्या काळात पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्याकडून भरीव मदत मिळेल, अशी आशा खान यांनी व्यक्त केली.