माणसाअगोदर या प्राण्यांनाही दिली गेली करोना लस

करोना प्रतिबंधक लस उपलब्ध झाल्यावर जगातील विविध देश लसीकरणाचे कार्यक्रम आखू लागले आहेत. करोनाचा संसर्ग प्राणीजगतालाही झाला असल्याच्या बातम्या आल्या आहेत. अमेरिकेत नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या मुंगुस प्रकारातील फेरेट या प्राण्यांना करोना लस दिली गेली आहे. हे प्राणी प्रामुख्याने कोलोराडो राज्यात सापडतात.

काळ्या पायाच्या आणि केसाळ फेरोटस पैकी २१० फेरेटसना गेल्या उन्हाळ्यात प्रयोगात्मक पातळीवर करोना लसीचे डोस दिले गेले आहेत. चाळीस वर्षापूर्वी ही जात नामशेष होण्याच्या मार्गावर होती. त्यांची संख्या ब्रिडिंग करून वाढविण्याचा प्रयत्न केला गेला होता. तरीही त्यांची संख्या म्हणावी त्या प्रमाणात वाढली नव्हती. या फेरेटच्या केसामध्ये करोना विषाणू सापडले होते त्यामुळे अमेरिका आणि युरोपीय देशात अनेक फेरेट ठार केले गेले. या प्राण्यांमध्ये करोना संक्रमण झालेले दिसलेले नाही.

अमेरिकेच्या उत्तर भागात ग्रेट प्लेन्स मधील गवताळ भागात आज मितीला ३७० फेरेट आहेत त्यातील ६० फेरेटना लस दिली गेलेली नाही. लसीचे काही दुष्परिणाम झालेच तर हे फेरेट सुरक्षित राहावेत यासाठी ही काळजी घेतली गेल्याचे समजते.