ट्रम्प यांचे फेसबुक आणि ट्विटर अकाऊंट तात्पुरते ‘ब्लॉक’


वॉशिंग्टन: ट्रम्प समर्थकांनी अमेरिकन राजधानीत घातलेल्या धिंगाण्यानंतर फेसबुकने २४ तर ट्विटरने १२ तासांसाठी ट्रम्प यांचे अकाऊंट ‘ब्लॉक’ केले आहे. अक्षयक्षपदाच्या निवडणूक निकालाबाबत अवास्तव दावे करणारा ट्रम्प यांनी प्रसिद्ध केलेला मजकूरही काढून टाकण्यात आला आहे.

ट्रम्प समर्थक निदर्शकांनी अमेरिकेच्या राजधानीत घुसून हिंसक आंदोलने केल्याच्या पार्श्वभूमीवर अधिक हिंसा टाळण्यासाठी आवश्यक उपाय म्हणून ट्रम्प यांचे ट्विटर हॅण्डल तात्पुरते बंद करण्यात आले आहे. त्यांची ३ ट्विट्स आक्षेपार्ह असून ती या कालावधीत काढून टाकण्यात आली नाहीत तर त्यांचे ट्विटर सुरू करण्यात येणार नाही, असे ट्विटरने सांगितले आहे. .

ट्रम्प यांच्या अकाऊंटवरील आक्षेपार्ह मजकुराने आपल्या दोन नियमांचे उल्लंघन होत असल्यामुळे त्यांचे अकाऊंट २४ तासांसाठी बंद ठेवण्यात आल्याचे फेसबुकने म्हटले आहे.