मुंबई : मुंबई पोलिसांनी महापौर किशोरी पेडणेकर यांना धमकी देणाऱ्या व्यक्तिला ताब्यात घेतले आहे. थेट गुजरातच्या जामनगरमधून मुंबईत पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. मनोज देढीया असे ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
मुंबईच्या महापौरांना धमकी देणाऱ्याला गुजरातमधून अटक
विशेष म्हणजे महापौरांना फोनवरुन जीवे मारण्याची धमकी देणारा हा तरुण फक्त 20 वर्षाचा आहे. जामनगरातून मनोज देढियाला तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक विलास तुपे यांच्या पथकाने अटक केली. त्याला घेऊन पोलीस आज मुंबईत दाखल झाले. महापौरांना धमकी का दिली याची चौकशी त्याने पोलीस करत आहेत. महापौरांना धमकी देणाऱ्या आरोपीला आज सकाळी 11 वाजता किल्ला कोर्टात हजर करण्यात आले. आरोपी मनोज देडिया याला आझाद मैदान पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.