हेमंत नगराळे यांच्याकडे राज्याच्या पोलीस महासंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार


मुंबई – केंद्रात सुबोधकुमार जयस्वाल यांना प्रतिनियुक्ती मिळाल्यानंतर नववर्षात राज्याला नवीन पोलीस महासंचालक मिळणार असल्यामुळे राज्याचे नवीन पोलीस महासंचालक कोण होणार याची चर्चा रंगली होती. पण आता हेमंत नगराळे यांच्याकड़े महाराष्ट्र राज्याच्या पोलिस महासंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे. ते सध्या लीगल आणि टेक्निकल विभागाचे डीजी आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस महासंचालकपदी एका मराठी चेहर्‍याला महाविकास आघाडी सरकारची पसंती मिळण्याची शक्यता होती. त्याबाबतचा अंतिम निर्णय राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे दोघे मिळूनच घेणार होते. पण सध्यातरी शरद पवारांची हेमंत नगराळे यांच्या नावाला पसंती मिळाल्यामुळे त्यांच्याकड़े राज्याच्या सुरक्षेची जबाबदारीचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे.