अमृता फडणवीसांचे नवे गाणे तुमच्या भेटीला


माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी आणि गायिका अमृता फडणवीस यांचे नवे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. हे गाणे नुकतेच सोशल मीडियावर लाँच झाले आहे. ‘डाव’ चित्रपटातील या गाण्याचे ‘अंधार’ असे बोलत आहेत. हे गाणे अभिनेत्री सागरिका घाटगे आणि गुलशन देवैया या जोडीवर चित्रित केले आहे. ‘डाव’ या सस्पेन्स, थ्रिलर अशा धाटणीचा हा चित्रपट आहे. लेखक मंदार चोळकरने हे गाणे लिहिले असून संगीत जीत गांगुलीचे आहे. या चित्रपटातील दिग्दर्शन कनिष्क वर्माने केले आहे.

सागरिका घाटगेचा हा दुसरा मराठी चित्रपट असून सागरिकाने या अगोदर “प्रेमाची गोष्ट’ या चित्रपटात अभिनेता अतुल कुलकर्णीसोबत काम केले होते. तर अभिनेता गुलशन देवैया या चित्रपटाच्या माध्यमातून मराठीत पदार्पण करत आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून गुलशन मराठी शिकला आहे.

अमृता फडणवीस यांचे या अगोदर ‘हॅलो’ हे गाणे रिलीज झाले होते. या गाण्याचा व्हिडिओ त्यांनी अधिकृत ट्विटर आणि इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर केला होता. अमृता यांचे गाण्याचे प्रेम आपल्या सर्वांना सर्वश्रृत आहे. महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत त्यांनी एका चित्रपटासाठी गाणे गायले होते.