रोहित पवारांना आवरता आला नाही अंडा भुर्जी बनवण्याचा मोह


नवी मुंबई : मंगळवारी पहाटे चार वाजताच नवी मुंबईचा नवी मुंबईमधील एपीएमसी भाजी मार्केटला राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी भेट दिल्यानंतर नवी मुंबईचा संध्याकाळी फेरफटका मारला. यावेळी त्यांनी एका अंडा भुर्जीच्या गाडीवर स्वत:च अंडा भुर्जी बनवल्याची माहिती स्वत: रोहित पवार यांनी ट्वीट करत दिली.

नवी मुंबईतील विविध ठिकाणी भेट देत असताना भूक लागल्याने एके ठिकाणी सर्वांनी अंडा भुर्जीचा आस्वाद घेतला. यावेळी अंडा भुर्जी बनवतानाचे त्या युवकाचे स्कील पाहून मलाही अंडा-भुर्जी बनवण्याचा मोह आवरला नाही. शेवटी त्याच्यासारखी भुर्जी मला बनवता आली नाही, पण प्रयत्न केल्याचा आनंद मात्र मिळाल्याचे रोहित पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये सांगितले.


राजकारणात हातखंडा असलेल्या आमदार रोहित पवारांना रस्त्यावरील गाडीवर अंडा भुर्जी बनवताना पाहून तिथे उपस्थित सर्वच आवाक झाले. अंडा भुर्जी बनवणाऱ्या तरुणासारखी भुर्जी आपल्याला बनवता आली नाही, अशी प्रांजळ कबुलीही त्यांनी दिली. दरम्यान रोहित पवार यांनी याआधी मातृदिनाला त्यांच्या मातोश्रींसाठी चहा बनवला होता. त्याचे काही फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले होते. आता गाडीवर अंडा भुर्जी बनवतानाचा व्हिडीओ त्यांनी शेअर केला आहे.

मंगळवारी नवी मुंबईचा रोहित पवार यांनी दौरा केला. सर्वात आधी एपीएमसीमधील यंत्रणा जाणून घेण्यासाठी त्यांनी पहाटे चार वाजता भाजी मार्केटला भेट दिली. यावेळी शेतकरी वर्गाने पाठवलेल्या मालाचे मूल्यमापन कसे होते, व्यापारी, माथाडी वर्गाच्या समस्या काय हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. रोहित पवारांनी ट्वीट करुन याची माहिती दिली.