VIDEO ; धोनीच्या लेकीचे जाहिरात क्षेत्रात पदार्पण


महेंद्रसिंह धोनीपेक्षा जास्त ब्रँड व्हॅल्यू असलेले फारसे खेळाडू क्रिकेटच्या दुनियेत नाहीत. २०२०मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून धोनीने निवृत्ती स्वीकारली असली तरीदेखील जाहिरातविश्वातील त्याचा दबदबा कमी झालेला नाही. त्यातच एका प्रसिद्ध ब्रँडच्या जाहिरातीसाठी आता धोनीसह त्याची लेक झिवा हिलाही अभिनयाची संधी मिळाली आहे. झिवाला वयाच्या पाचव्या वर्षीच आपली पहिली जाहिरात मिळाली आहे. बाबा धोनी आणि लेक झिवा हे दोघेही एका ख्यातनाम अशा उत्पादनाच्या जाहिरातीत दिसत आहेत.


अवघ्या पाच वर्षांची झिवा असून झिवाचा फार मोठा चाहतावर्ग आहे. झिवाचे इन्स्टाग्रामवर एक अकाऊंट आहे. १.८ दशलक्ष फॉलोअर्स या सोशल मीडियावर साईटवर आहेत. तिच्या अकाऊंटवरून तिचे स्वत:चे आणि धोनी-साक्षीसोबतचे फोटो पोस्ट केले जातात. मोठ्या प्रमाणात लाईक्स या फोटो आणि व्हिडीओंना मिळत असतात. झिवा नव्या वर्षात पुढचे पाऊल टाकत एका प्रसिद्ध उत्पादनाच्या जाहिरातीत झळकली आहे. धोनी आणि झिवा ओरियो या चॉकलेट क्रिम बिस्कीटच्या जाहिरातीत मस्ती करताना दिसत आहेत.