अमेरिका लादणार भारतावर निर्बंध?


वॊशिंग्टन: भारताने रशियाकडून ‘एस -४००’ हवाई संरक्षण प्रणाली खरेदी करण्यासाठी केलेला अब्जावधी डॉलर्सचा करार अमेरिकेच्या नाराजीचे कारण ठरला असून अमेरिकन काँग्रेसच्या संशोधन सेवा संस्थेने सादर केलेल्या अहवालानुसार त्याबद्दल भारतावर निर्बंध लादण्याचे पाऊल अमेरिका उचलू शकते.

‘कॉंग्रेशनल रिसर्च सर्व्हिस’ (सीआरएस) ही कॉंग्रेसला निर्णय घेण्यासाठी माहिती उपलब्ध करून देणारी स्वायत्त संस्था आहे. या संस्थेचे अहवाल काँग्रेसला बंधनकारक नाहीत. निर्णय घेण्यासाठी संदर्भ म्हणून या अहवालांचा उपयोग केला जातो.

भारत तंत्रज्ञान सहकार्य आणि संयुक्त उत्पादन प्रकल्पांच्या उभारणीसाठी उत्सुक आहे. भारताने संरक्षण उत्पादनांबाबत अधिक उदार धोरण स्वीकारावे असा अमेरिकेचा आग्रह आहे. भारताने संरक्षण उत्पादन क्षेत्रात थेट परकीय गुंतवणूकीला प्रोत्साहन द्यावे, अशीही अमेरिकेची अपेक्षा आहे. मात्र, रशियाबरोबर केलेल्या करारामुळे अमेरिका नाराज आहे. यापूर्वी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी देशांवर निर्बंध लादण्याची करतानाच भारतालाही तंबी दिली आहे.
.
भारताने रशियाबरोबर एस- ४०० संरक्षण प्रणाली खरेदी करण्यासाठी केलेल्या करारामुळे अमेरिका निर्बंध कायद्यानुसार भारतावर निर्बंध शकते, असे ‘सीआरएस’च्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. अमेरिकन खासदारांना सुयोग्य निर्णय घेण्यास मदत व्हावी यासाठी स्वतंत्र तज्ञ ‘सीआरएस’च्या माध्यमातून काँग्रेसला अहवाल सादर करीत असतात.