लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर अभिनेत्री काजोल पदार्पण करणार असून सध्या ती आपल्या ‘त्रिभंग’ या चित्रपटात व्यस्त असून नुकताच तिने आपल्या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करत त्याबद्दलची माहिती तिने आपल्या फॅन्सला दिली. रेणुका शहाणे ‘त्रिभंग’चे दिग्दर्शन करत आहे, तर चित्रपटात काजोल मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे.
काजोलच्या आगामी ‘त्रिभंग’चा ट्रेलर रिलीज
‘त्रिभंग’ मध्ये मिथिला पालकर, तन्वी आझमी आणि आणि कुणाल रॉय कपूर हेदेखील मुख्य भूमिकांमध्ये दिसतील. हा चित्रपट 15 जानेवारीला नेटफिक्सवर रिलीज होणार आहे. काजोलचा ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार हा पहिलाच चित्रपट आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात ती ओडिसी डान्सरच्या रोलमध्ये दिसणार आहे.
या चित्रपटाच्या शुटिंग दरम्यान काजोल, मिथिला पालकर आणि तन्वी आझमी या तिघींनी रेणुका शहाणेबरोबर खूपच धम्माल मस्ती केली. या चित्रपटात उलगडताना दिसणार आहे. अशाप्रकारचा रोल काजोलने यापूर्वी कधीच केलेला नव्हता. त्रिभंगची निर्मिती अजय देवगणने केली असल्यामुळे या चित्रपटाकडून काजोलला विशेष अपेक्षा आहेत.