मंत्रालयातील घरकोंबड्यांसाठी कोणती नियमावली जाहीर केली आहे का?; भातखळकरांचा टोला


मुंबई – नव्या वर्षात कार्यालयात उशिराने पोहोचणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना चांगलाच चाप बसणार आहे. त्यानुसार सरकारी कर्मचाऱ्यांना महिन्यातून केवळ दोन वेळाच जास्तीत जास्त दीड तास उशिरा येण्याची सवलत असणार आहे. त्यानंतरच्या तिसऱ्या ‘लेटमार्क’साठी अधिकारी, कर्मचाऱ्यांची रजा वजा करण्यात येणार आहे. याबाबतचा शासन निर्णय (जीआर) गुरुवारी सामान्य प्रशासन विभागाने जारी केल्यानंतर भाजप नेते अतुल भातखळकर यांनी ठाकरे सरकारला टोला लगावला आहे.

ट्विटरच्या माध्यमातून भातखळकर यांनी कामावर उशिरा येणाऱ्या लेटलतिफांना चाप; सरकारकडून नवी नियमावली जाहीर आणि मंत्रालयात न जाणाऱ्या घरकोंबड्यांसाठी सरकारने काही नियमावली जाहीर केली आहे का?,” असे म्हणत निशाणा साधला आहे.