कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन लसींना आपातकालीन वापरासाठी परवानगी


नवी दिल्ली – कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन्ही लसींना भारतात आपातकालीन वापरासाठी परवानगी देण्यात आल्यामुळे लसीकरणाच्या प्रक्रियेतला सर्वात मोठा टप्पा पार पडला आहे.

सीरम आणि ऑक्सफोर्डने तयार केलेल्या कोव्हिशिल्ड आणि भारत बायोटेक कंपनीने तयार केलेल्या कोव्हॅक्सिन या दोन्ही लसींना आपातकालीन वापरासाठी संमती देण्यात आल्याची माहिती पत्रकार परिषद घेऊन डीसीजीआयने दिली आहे. कोरोनाचा फैलाव भारतात मोठ्या प्रमाणावर झाल्यानंतर लसीकरणाच्या मोहिमेची चर्चा सुरु झाली. कालच ड्राय रनही पार पडला. आता आपातकालीन वापरासाठी दोन्ही लसींना संमती मिळते की नाही याची प्रतीक्षा होती. दरम्यान दोन्ही लसींना संमती देण्यात आली आहे. लसीकरणाच्या मोहिमेतील हे एक महत्त्वाचे पाऊल आहे.