तर ती भाषा तुम्ही खुशाल सुरू ठेवू शकता, त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा! ; रश्मी ठाकरेंना चंद्रकांत पाटलांचे पत्र


मुंबई – ‘सामना’च्या भाषेवरून शिवसेना व भाजपमध्ये चांगलाच वाद रंगला आहे. सामनातील भाषेबद्दल आक्षेप घेत संपादक रश्मी ठाकरेंना पत्र लिहिणार असल्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटले होते. चंद्रकांत पाटलांनी अखेर रश्मी ठाकरेंना पत्र लिहिले असून, सामनात वापरल्या गेलेल्या भाषेबद्दल त्यांच्याकडे तक्रार केली आहे. विशेष म्हणजे कार्यकारी संपादक संजय राऊत यांचा कुठेही उल्लेख या पत्रात करण्यात आलेला नाही.

सध्या भाजप आणि शिवसेनेत ईडीच्या नोटीसवरून कलगीतुरा सुरू आहे. शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत भाजप नेत्यांवर टीका करताना दिसत आहे. दुसरीकडे ‘सामना’तूनही भाजप नेत्यांवर टीकास्त्र साधले जात आहे. त्याबद्दल चंद्रकांत पाटील यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्याचबरोबर आता रश्मी ठाकरेंना पत्र लिहिले आहे.

चंद्रकांत पाटील यांनी रश्मी ठाकरेंना लिहिलेले पत्र