कोरोना प्रतिबंधक लस दुसऱ्या व्हॅरिएंटच्या बाबतीत कमी प्रभावी किंवा अकार्यक्षम असेल – आरोग्य मंत्रालय


नवी दिल्ली : कोरोना व्हायरसचे पहिले संकट टळत नाही तोच युरोपातील काही देशांमध्ये कोरोनाचा नवा स्ट्रेन आढळून आला असून विशेष म्हणजे त्याच्या प्रादुर्भावासही सुरुवात झाली आहे. त्यामुळे या देशांनी इतर देशांना पुन्हा एकदा सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे. त्यातच आता पहिल्या प्रकारच्या कोरोनावर मात करण्यासाठी म्हणून विकसित करण्यात आलेली प्रतिबंधक लस ही दुसऱ्या व्हॅरिएंटच्या बाबतीत कमी प्रभावी किंवा अकार्यक्षम असेल अशीही शक्यता वर्तवण्यात आली आहे.

या नव्या प्रकारापासून सध्याच्या लसी रुग्णांचे रक्षण करण्यात अपयशी ठरल्याचा कोणताही पुरावा युके, दक्षिण आफ्रिका अशा राष्ट्रांकडून देण्यात आला नसल्याचे मंगळवारी घेण्यात आलेल्या एका पत्रकार परिषदेत प्रिन्सिपल साइंटीफिक के. विजय राघवन यांनी सांगितले.

त्यांनी सध्याच्या लसीबाबत याचवेळी हमी दिली. त्याचबरोबर त्यांनी आपल्या वक्तव्यावर स्पष्टीकरणही दिले. या व्हॅरिएंट्समध्ये जिथे बदल होण्याची शक्यता आहे, त्यावरच ही लस निशाणा साधते. आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवून ही लस शरीरात अॅन्टीबॉडीज निर्माण करते. त्यामुळे व्हॅरिएंटमध्ये बदल झाला तरीही हा बदल लसीचा प्रभाव कमी करण्यास मात्र पुरेसा पडत नाही. थोडक्यात, लसीचा प्रभाव कमी करत नाही. दरम्यान, आयसीएमआरही कोरोनाच्या या म्युटेशनवर नजर ठेवून आहे.