पात्र खेळाडूंना ऑलिम्पिक पूर्व तयारीसाठी राज्याकडून अर्थसहाय्य प्रदान


मुंबई: टोकियो ऑलिम्पिक २०१२ स्पर्धेसाठी निवड झालेल्या पात्र खेळाडूंना राज्यशासनाच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते प्रत्येकी ५० लाख रुपयांचे अर्थसहाय्य प्रदान करण्यात आले.

नेमबाजी १० मीटर एअर रायफल स्टँडींग कॅटेगरी – एस एच १ चे खेळाडू स्वरुप उन्हाळकर (पॅरा ऑलिंपिक), नेमबाजी २५ मीटर स्पोर्टस पिस्टलच्या खेळाडू राही सरनोबत, नेमबाजी ५० मीटर रायफल थ्री पोझिशनच्या खेळाडू तेजस्विनी सावंत, धनुर्विद्या (आर्चरी रिकर्व्हर) सांघिकचे खेळाडू प्रवीण जाधव, ॲथलेटिक्स ३००० मीटर स्टिपलचे खेळाडू अविनाश साबळे यांना प्रत्येकी ५० लाख रुपये, एकूण २ कोटी ५० लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य वितरित करण्यात आले.

यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी सरकार खेळाडूंच्या पाठीशी असून गुणवंत खेळाडूंचे पालकत्व सरकार घेत असल्याची ग्वाही दिली. अजित पवार म्हणाले, लोकसंख्येच्या प्रमाणात खेळाडू पुढे आणण्यासाठी सरकारच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. भविष्यातही क्रीडासंस्कृतीला प्रोत्साहन देण्यासराठी सरकार नेहमी प्रयत्नशील राहणार आहे, असेही ते म्हणाले.