नव्या वर्षात टेस्ला करणार भारतात पदार्पण


नवी दिल्ली: जगातील नामांकीत वाहन उत्पादक असलेल्या टेस्लाचे नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच भारतात पदार्पण होत आहे. जानेवारी महिन्यात या कंपनीच्या मॉडेल-३ कारचे बुकिंग सुरू करण्यात येणार असून जून महिन्यापासून गाड्या ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यास सुरूवात करण्यात येईल, असे सूत्रांनी सांगितले.

टेस्ला सन वर्षांपासून भारतीय बाजारपेठेत प्रवेश करण्यासाठी उत्सुक आहे. अखेर नव्या वर्षात हा मुहूर्त साधला जाणार आहे.कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी ऍलॉन मास्क यांनी स्वतः ट्विट करून सन २०२१ मध्ये भारतात पदार्पण करीत जाहीर केले आहे. भारतात बॅटरी उत्पादन प्रकल्प आणि संशीध, विकास केंद्र उभारण्याचेही कंपनीचे नियोजन आहे.

भारतात कंपनी वितरक नेमणार नाही तर ऑनलाईन नोंदणी करण्यात येणार आहे. नोंदणी झालेली वाहने चीनमधून आयात करून भारतीय ग्राहकांपर्यंत पोहोचविली जाणार आहेत. टेस्ला मॉडेल ३ ची भारतातील किंमत ५५ लाख रुपये असेल असे सांगण्यात येत आहे. ३. १ सेकंदात ही गाडी तशी १०० किलोमीटरचा वेग गाठू शकते. सर्वाधिक वेग १६२ किलोमीटर प्रति तास असेल अशीही चर्चा आहे. मात्र, याबाबत कंपनीकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.