ग्वाल्हेर: एकेकाळी सर्वसमावेशक पक्ष अशी ओळख असलेली काँग्रेस संकुचित झाली असून सर्वसामान्यांच्या हिताच्या निर्णयांनाही केवळ विरोधासाठी विरोध करणे हीच त्यांची परंपरा बनली आहे. त्यामुळेच सर्वसामान्य जनतेचा काँग्रेसवरील विश्वास उडत चालला आहे; अशी टीका काँग्रेसमधून भारतीय जनता पक्षाच्या डेऱ्यात दाखल झालेले खासदार ज्योतिरादित्य सिंदिया यांनी केली.
… म्हणून काँग्रेस गमावत आहे जनसामान्यांचा विश्वास: ज्योतिरादित्य सिंधिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारने सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी अनेक निर्णय घेतले आहेत. अनेक योजना आणल्या आहेत. त्यामुळे देशातील जनता पंतप्रधान आणि भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी ठामपणे उभी आहे. या उलट काँग्रेसने सर्वसामान्य जनतेशी नाळ तोडल्याने त्यांना जनाधार उरलेला नाही, असे मत सिंदिया यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.
काँग्रेस पक्षातील ज्येष्ठ आणि तरुण नेत्यांमधील दुफळी आणि वादांबाबत बोलताना सिंदिया म्हणाले की, यापूर्वी देखील काँग्रेस पक्षात मतभेद आणि वादविवाद होते. मात्र, ते संघर्ष बंद दाराआड लढले जात होते. आता ते चव्हाट्यावर सर्वांच्या नजरेसमोर आले आहेत.