‘मेरे राख को उस क्षितिज पे छोड देना’: कंगनाने ट्विट केली नवी कविता


मुंबई: मागील काही काळापासून सतत कोणत्या ना कोणत्या वादामुळे चर्चेत असलेल्या अभिनेत्री कंगना राणावत हिने आपले एक वेगळे रूप चाहत्यांसमोर आणले आहे. निसर्गाच्या कुशीत गिरिभ्रमण करताना सुचलेल्या एका कवितेचा व्हिडीओ तिने ट्विट केला आहे.

‘राख’ असे शीर्षक असलेल्या कवितेत कंगना म्हणते, माझ्या अस्थी गंगेत विसर्जन करू नका. प्रत्येक नदी सागराला जाऊन मिळते. खोलीची मला भीती वाटते. मला आकाशाला स्पर्श करायचा आहे. माझी रक्षा पहाडाच्या टोकावर पसरून टाका. जेव्हा सूर्य उगवेल, मी त्याला स्पर्श करू शकेन. जेव्हा एकटेपण सातवेळा, मी चंद्राशी गुजगोष्टी करू शकेन. माझी रक्षा अशा क्षितिजावर नेऊन ठेवा…

या व्हिडिओमध्ये कविता ऐकू येत असताना त्याच्या पार्श्वभूमीवर कंगना पर्वताच्या एका उंच ठिकाणी बर्फात खेळण्याची मजा लुटताना दिसते. तिचे कुटुंबीयही तिच्याबरोबर निसर्गाचा आनंद घेत आहेत.