
बिजिंग : गेम डेव्हलपर आणि Yoozoo चे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी लिन ची यांचे निधन झाले असून लिन ची यांना खरी ओळख थ्रोन्स (Game of Thrones) या वेब सीरिजमुळे मिळाली. पोलिसांच्या तपासातून हे दिसून आले आहे की, त्यांच्या चहामध्ये विष टाकून त्यांची हत्या करण्यात आली आहे. लिन ची यांचे सहकारी Xu यांच्यावर शांघायच्या पोलिसांचा संशय आहे.
चहात विष टाकून Game of Thrones चे डेव्हलपर लिन ची यांची हत्या
हुरुन चायना रिच लिस्टच्या माहितीनुसार, जवळजवळ 6.8 बिलियन युआन म्हणजे भारतीय रुपयांप्रमाणे 76 अरब 60 करोड़ रुपये एवढी लिन ची यांची एकूण संपत्ती होती. नाताळच्याच दिवशी त्यांची हत्या झाली आहे. त्यांच्या शोकसभेसाठी त्यांच्या ऑफिसमधील सगळे सहकारी एकत्र जमले होते. लिन यांची हत्या त्यांच्या संपत्तीमुळे झाली असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याबाबत पोलिसांचा अधिक तपास सध्या सुरू आहे.
चीनमधील गेमिंग क्षेत्रातील सर्वात नावाजलेल्या व्यक्तींपैकी लिन ची एक होते. त्यांनी सिनेक्षेत्रातून गेमिंगच्या क्षेत्रात पाऊल टाकले होते. 2009 मध्ये Yoozoo या कंपनीची त्यांनी स्थापना केली आणि अल्पावधीतच यशाची अनेक शिखरं गाठली. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी मोबाईल गेमिंग क्षेत्रात खूप चांगले बदल केले. Yoozoo कंपनीचा विस्तार केवळ चीनपुरताच मर्यादित राहिलेला नाही तर आशिया, युरोप आणि अमेरिकेतही त्यांचा व्यवसाय सुरू आहे. जगभरात प्रसिद्ध असलेल्या गेम ऑफ थ्रोन्स या वेब सीरिजचे ते डेव्हलपर होते.
