जाणून घेऊया प्राण्यांशी निगडित काही रोचक तथ्ये


आपल्या रोजच्या जीवनामध्ये क्वचित कधी तरी अनेक आश्चर्यकारक गोष्टी आपल्या समोर येत असतात. ह्यातील काही निसर्गाशी निगडित असतात, काही निरनिराळ्या वस्तूंशी निगडित असतात, तर काही माणसांशी निगडित असतात. त्याचप्रमाणे प्राण्यांशी निगडित अशीही अनेक रोचक तथ्ये आहेत. प्राण्यांच्या हुशारीबाबत बोलायचे झाले, तर डुक्कर हा प्राणी सर्व प्राण्यांमध्ये अतिशय हुशार प्राणी समजला जातो. त्याचबरोबर डॉल्फिन हा मासा सर्व प्राणीजातींमध्ये सर्वात हुशार समजला जातो.

प्राचीन काळी अस्तित्वात असलेले काही डायनोसॉर शाकाहारी आहेत असे म्हटले जाते. हे डायनोसॉर केवला गवत खून जगत असल्याचे म्हटले जात असे. पण शास्त्रज्ञांच्या मते सर्वच जातीचे डायनोसॉर मांसाहारी होते. त्याचप्रमाणे मगर या अज्मिनीवर आणि पाण्यामध्ये राहणाऱ्या प्राण्याची जीभ तिच्या टाळूला चिकटलेली असते. मगरीच्या जिभेची हालचाल होत नाही, किंवा आपली शिकार गिळण्यासाठी देखील मगर आपल्या जिभेचा वापर करीत नाही. मात्र मगरीची लाळ स्टील आणि आरसाही वितळवू शकेल इतकी भयंकर उग्र असते.

आणखी एक रोचक तथ्य असे, की पॅरिसमध्ये माणसांपेक्षा कुत्र्यांची संख्या जास्त आहे. पॅरिस वासियांना कुत्री पाळण्याचा शौक आहेच, पण त्याचबरोबर एकापेक्षा अधिक कुत्री पाळण्याची हौस येथील नागरिकांना आहे. तसेच न्यूझीलंड या देशामध्ये माणसाची संख्या ४० मिलियन आहे, तर मेंढ्यांची संख्या ७० मिलियन इतकी आहे. न्यूझीलंड मधील शेतकऱ्यांचा मेंढीपालन हा प्रमुख व्यवसाय आहे. त्यामुळे माणसे कमी आणि मेंढ्या जास्त असे काहीसे दृश्य न्यूझीलंड येथे पाहायला मिळते.

निसर्गाने प्राण्यांना अनेक अजब क्षमता प्रदान केल्या आहेत. अश्या खास क्षमता असलेले पोपट आणि ससा हे दोनच प्राणी असे आहेत, ज्यांना चौफेर पाहता येते. या प्राण्यांना मान न वळवता देखील मागच्या बाजूला पाहता येते. इतर कोणत्याही प्राण्याला निसर्गाने ही क्षमता दिलेली नाही.

Leave a Comment