राष्ट्रीय लोकतांत्रिक पक्ष रालोआमधून बाहेर: आंदोलनाला पाठींबा


नवी दिल्ली: शेतकऱ्यांच्या विरोधात असणाऱ्या कोणाचीही साथ देऊ शकत नसल्याचे सांगत अनुमान बेनीवाल यांच्या राष्ट्रीय लोकतांत्रिक पक्षाने भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी नव्या कृषी कायद्यांना विरोध करीत एकालाही डाळ या भाजपच्या सर्वात जुन्या सहकारी पक्षानेही आघाडी सोडली आहे.

राष्ट्रीय लोकतांत्रिक पक्षाची भाजपबरोबर केंद्रात आणि राजस्थानात असलेली युती संस्थापक बेनीवाल यांनी संपुष्टात आणली. बेनीवाल हे नागपूर (राजस्थान) येथील खासदार आहेत. नव्या शेतकरी कायद्यांच्या विरोधात त्यांनी नुकताच तीन संसदीय समित्यांचा राजीनामा दिला आहे. शेतकरीविरोधी भूमिका घेणाऱ्या भाजपाला फेव्हिकॉल लावल्याप्रमाणे आपण चिकटून राहू शकत नाही, असे ते म्हणाले.

राजस्थान- हरियाणा सीमेवरील शहाजहानपूर खेडा या ठिकाणी आंदोलन करणाऱ्यांना शेतकऱ्यांची बेनीवाल यांनी भेट घेऊन शेतकरी आंदोलनाला त्यांनी पाठींबा जाहीर केला. शेतकऱ्यांचे आंदोलन सुमारे महिनाभर ताणले गेले असून केंद्रातील भाजप सरकारने आता याबाबत निर्णय घेणे आवश्यक आहे, असे माताही त्यांनी व्यक्त केले.