सध्या यात व्यस्त आहे केरळमधील करोना पेशंट झिरो

फोटो साभार एनडीटीव्ही

गेल्या वर्ष अखेरी चीन मधून करोनाचा जगभर प्रसार झाला आणि भारतात करोनाची पहिली केस म्हणजे पेशंट झिरो केरळ मध्ये सापडली होती. ३० जानेवारी रोजी वुहान येथे वैद्यकीय शिक्षण घेत असलेली थ्रिसुरची रहिवासी उषा राम मनोहर भारतात परतली आणि घरी आल्यावर तिला त्रास होऊ लागल्याने तिची करोना चाचणी केली गेली ती पोझिटिव्ह आली होती. त्यामुळे उषा भारतातील पहिली करोना संक्रमित ठरली होती. विषाणू, जीवाणू संक्रमित् जी पहिली व्यक्ती असते तिला पेशंट झिरो असे म्हटले जाते.

उषा करोना संक्रमणातून पूर्ण बरी झाली असून आता ती ऑनलाईन शिक्षण घेते आहे. केरळ मधील खूप विद्यार्थी वुहान विद्यापीठात शिक्षण घेत आहेत. शिक्षण शुल्क कमी आणि चांगल्या सुविधा यामुळे वुहान मध्ये शिक्षण घेण्यासाठी जाणारे विद्यार्थी मोठ्या संखेने आहेत. उषा तीन वर्षे वुहान मध्ये होती आणि करोना साथ सुरु झाल्यावर तिने मायदेशी येण्याचा निर्णय घेतला हों.

प्रथम ती वुहान येथून कोलकाता येथे आली आणि तिने कोचीची फ्लाईट घेतली. दोन्ही ठिकाणी तिची स्क्रीनिंग टेस्ट झाली होती पण त्यावेळी तिच्यामध्ये करोनाचे कोणतेही लक्षण दिसले नव्हते असे समजते. घरी आल्यावर मात्र ही लक्षणे दिसू लागली आणि तिला रुग्णालयात दाखल केले गेले होते. पेशंट झिरो किंवा इंडेक्स केसची ओळख फार महत्वाची मानली जाते कारण त्यावरूनच आजार पसरविणारे कोण यांची माहिती मिळत असते.