बिकिनी फोटोशूटमुळे ट्रोल होत आहे कंगना राणावत


आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे अभिनेत्री कंगना राणावत नेहमीच चर्चेत असते. तिने आजवर बॉलिवूडमधील घराणेशाही ते देशांतील राजकारण अशा विविध विषयांवर रोखठोकपणे आपली मते मांडली आहेत. यामुळे तिला अनेकदा ट्रोल देखील केले गेले आहे. नुकताच तसाच काहीसा प्रकार तिच्यासोबत पुन्हा एकदा घडला आहे. पण ती यावेळी कुठल्याही वक्तव्यामुळे नव्हे तर चक्क बिकिनी फोटोमुळे ट्रोल होत आहे.


कंगनाने ट्विटरवर आपला बिकनीमधील एक फोटो ट्विट करत त्याला सुप्रभात मित्रांनो, सध्या जगातील सर्वात सुंदर देशांपैकी एक मॅक्सिको येथे आहे. सुंदर आणि कल्पनेच्या पलिकडील हे ठिकाण. मी हा फोटो मॅक्सिकोमधील एका बेटावर काढला आहे, अशा आशयाचे कॅप्शन त्याला दिले आहे. काही चाहत्यांना तिचा हा फोटो आवडला आणि या फोटोचे त्यांनी तोंड भरुन कौतुक केले. पण काही नेटकऱ्यांनी या फोटोची यथेच्छ खिल्ली उडवली. यापूर्वी अनेक सेलिब्रिटींच्या कपड्यांवर कंगनाने टीका केली होती. या पार्श्वभूमीवर तिचा हा बिकिनी अवतार पाहून हिच का हिंदू संस्कृती? असा टोला काही नेटकऱ्यांनी लगावला आहे.