राजधानीत खलिस्तान- पाकिस्तान जिंदाबादवाल्यांचे आंदोलन: लीलाराम


नवी दिल्ली: राजधानी दिल्लीतील आंदोलन हे शेतकऱ्यांचे नाही तर खलिस्तान- पाकिस्तान जिंदाबादवाल्या फुटीरतावाद्यांचे आहे, असे उद्गार भारतीय जनता पक्षाचे खासदार लीलाराम यांनी काढले. यापूर्वीही आपल्या वादग्रस्त विधानांनी ते चर्चेत आले आहेत. याच लोकांनी इंदिरा गांधी यांचा बळी घेतला आणि तेच आता नरेंद्र मोदींचाही बळी घेतील, असेही ते म्हणाले.

आंदोलनस्थळी इम्रान खान जिंदाबाद, भारत मुर्दाबाद अशा घोषणा आहेत. ज्यांनी बेअंतसिंग केली तोच तिथे २० फुटांचे कट आऊट लावून बसला आहे, असेही लीलाराम म्हणाले. सतलज, यमुना नदीजोड प्रकल्पावरून पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांच्यावर टीका करताना ते म्हणाले की पंजाबची काय बिशाद की आमच्या वाट्याचे पाणी रोखतील! पाणी काय त्यांच्या बापाचे आहे काय?

यापूर्वी सुधारित नागरिकत्व कायद्यावविरोधातील आंदोलनाबाबतही लीलाराम यांनी वादग्रस्त विधान केले होते. सुधारित नागरिकत्व कायद्याला विरोध करणाऱ्यांना एका तासात नष्ट केले जाऊ शकते, असे ते म्हणाले होते.