दिल्लीची नाकाबंदी करण्याचा आंदोलकांचा इशारा


नवी दिल्ली: नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात २५ दिवस सुरु असलेल्या आंदोलनादरम्यान आंदोलकांनी उत्तरप्रदेश आणि राजधानी दिल्ली यांच्यामधील गाझीपूर सीमा बंद करून राजधानीची नाकाबंदी करण्याचा इशारा दिला आहे.

किमान हमी भावाची खात्री सरकारने दिल्यानंतरही शेतकरी आंदोलनाची तीव्रता वाढतच आहे. कृषी कायदे पूर्णपणे रद्द करण्याच्या मागणीवर आंदोलक ठाम आहेत. आंदोलनात मरण पावलेल्या २० शेतकऱ्यांना आंदोलकांकडून आज श्रद्धांजली अर्पण करण्यात येणार आहे.

कृषी क्षेत्रातील सुधारणांना सहा महिन्यापूर्वीच सुरुवात करण्यात आली असून शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळण्यास सुरुवात झाली असल्याचा दावा करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा कृषी कायद्यांचे समर्थन केले आहे. नव्या कायद्यांबाबत कोणाला काही शंका असतील तर चर्चा करून ते दूर करण्याची सरकारची तयारी असल्याचेही मोदी यांनी सांगितले.