अजिंक्यच्या चुकीमुळेच बाद झाला विराट – संजय मांजरेकर


नवी दिल्ली – भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी अर्धशतक झळकावत भारतीय संघाच्या डावाला आकार दिला. विराटने चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणेसोबत महत्वपूर्ण भागीदारी केली. विराट कोहली अजिंक्य रहाणेसोबत फलंदाजी करत असताना लॉयनच्या गोलंदाजीवर धावबाद होऊन माघारी परतला. विराट ७४ धावांवर माघारी परतल्यामुळे चाहत्यांची चांगलीच निराशा झाली.

विराटच्या विकेटला अजिंक्य रहाणेला भारतीय संघाचे माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांनी जबाबदार ठरवले आहे. त्या चेंडूवर धाव घेण्याचा प्रश्नच नव्हता, क्षेत्ररक्षक खूप जवळ उभा होता. योग्य गोष्ट कोहलीने केली, बाद झाल्यानंतर पाठीमागे बघण्यात काहीच अर्थ नव्हता. आपली नाराजी त्याने व्यक्त केली, असे प्रसंग सामन्यात खूप दुर्दैवी असतात. विराट बाद झाला ही पूर्णपणे अजिंक्यची चूक होती. आपल्या सहकाऱ्याच्या चुकीमुळे बाद झाल्यानंतरही विराट ज्या पद्धतीने शांत राहिला, हे पाहून मलाही खरंच आश्चर्य वाटले, असे मत संजय मांजरेकरांनी मांडले.

अशा प्रकारे आऊट झाला विराट कोहली