मातोश्रीपेक्षा पवारांच्या चरणी संजय राऊतांची अधिक निष्ठा – गोपीचंद पडळकर


मुंबई – भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांना सामना अग्रलेखात फेकूचंद असा उल्लेख केल्याने खरमरीत पत्र लिहिले आहे. संजय राऊतांनी सत्तेच्या धुंदीत लेखणी विरोधकांवर चालते, अशी टीका पडळकर यांनी केली असून मराठा मोर्चांना मूक म्हणणाऱ्या सामनाकडून दुसरी अपेक्षाही काय करणार असे देखील म्हटले आहे. त्याचबरोबर मी आपणास खरंतर शरद पवारांचा पंटर, खबऱ्या, चमचा उसा उल्लेख करु शकलो असतो, असेही म्हटले आहे.


ट्विटरवर आपले पत्र गोपीचंद पडळकर यांनी शेअर केले आहे. सामना मी कधी वाचत नाही. सोशल मीडियामधून मला लेख वाचायला मिळाला. सामनाच्या अग्रलेखातून संजय राऊत यांनी माझ्यावर टीका केली. त्यांच्या विकृत लिखाणाला उत्तर देण्यासाठी माझ्यासोबत अनेक जाणकार मंडळी महाराष्ट्रभर काम करत आहेत.त्याचसाठी हा पत्र प्रपंच, असे म्हणत त्यांनी पत्र ट्विट केले आहे.

गोपिचंद पडळकरांनी संजय राऊत यांना लिहिलेले पत्र