सर्वोच्च न्यायालयाच्या अवमान प्रकरणी कुणाल कामरा व रचिता तनेजा यांना नोटीस


नवी दिल्ली – सर्वोच्च न्यायालयाने स्टॅण्डअप कॉमेडियन कुणाल कामरा आणि व्यंगचित्रकार रचिता तनेजा यांना कारण दाखवा नोटीस बजावली आहे. कुणाल कामरा व रचिता तनेजा यांच्याविरुद्ध न्यायालयाचा अवमान केल्या प्रकरणी याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाने या याचिकांसंदर्भात दोघांनाही नोटीस बजावली आहे.

अर्णब गोस्वामींना जामीन दिल्यानंतर कुणाल कामराने एक ट्विट केले. त्यावर आक्षेप घेण्यात आला होता. तर न्यायालयाचा रचिता तनेजाने काढलेल्या व्यंगचित्रातून अवमान झाल्याचे सांगत अवमान खटला चालवण्याची मागणी करण्यात आली होती. अवमान खटला दोघांविरुद्ध चालवण्यास अॅटर्नी जनरल के. वेणुगोपाल यांनी परवानगी दिल्यानंतर शुक्रवारी दोघांनाही सर्वोच्च न्यायालयाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. सहा आठवड्यात दोघांनाही उत्तर सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.