फ्रांस राष्ट्रपती इमॅन्यूअल मँक्रो याना करोना

फोटो साभार अमर उजाला

फ्रांसचे राष्ट्रपती इमॅन्यूअल मँक्रो यांना करोना संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले आहे यामुळे पुढील आठवडा त्यांना विलगीकरणात राहावे लागणार आहे. इमॅन्यूअल मँक्रो यांनी स्वतःच ही माहिती दिली असून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इमॅन्यूअल मँक्रो यांना ‘लवकर बरे व्हा’ असा संदेश दिला आहे.

काही दिवसांपूर्वी इमॅन्यूअल मँक्रो यांच्यामध्ये करोनाची लक्षणे दिसली होती. त्यानंतर लगोलग त्यांची करोना चाचणी केली गेली तेव्हा त्यांचा रिपोर्ट पोझिटिव्ह आला. राष्ट्रपती करोना साठी लागू केलेल्या राष्ट्रीय नियमांचे पालन करणार असून सात दिवस विलगीकरणात राहणार आहेत. फ्रांसचे पंतप्रधान सुद्धा होम क्वारंटाइन झाले असल्याचे समजते.

जगभरात ज्या अनेक बड्या राष्ट्र्प्रमुखाना करोना झाला त्या यादीत आता इमॅन्यूअल मँक्रो यांचा समावेश झाला आहे. यापूर्वी ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनल्ड ट्रम्प याना करोना लागण झाली होती. या आठवड्यात फ्रांस मध्ये करोनाची दुसरी लाट आली असून पुन्हा अनेक ठिकाणी लॉकडाऊन लागू झाला आहे. रात्री ८ नंतर संचारबंदी आहे आणि थियेटर्स, रेस्टॉरंटस, कॅफे बंद आहेत.