वॊशिंग्टन: अध्यक्षपदावरून पायउतार होण्यापूर्वी डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने टर्कीवर निर्बंध घातले आहेत. रशियाकडून ‘ट्रायंफ’ ही क्षेपणास्त्रविरोधी यंत्रणा खरेदी केल्याबद्दल ही कारवाई करण्यात आली आहे. भारतासह इतर देशांनाही रशियाकडून शस्त्रास्त्र खरेदी न करण्याची तंबी अमेरिकेने दिली आहे.
रशियाशी शस्त्रास्त्र व्यापार न करण्याची अमेरिकेची तंबी: टर्कीवर निर्बंध
नाटोमध्ये अमेरिकेचा सहकारो असूनही टर्कीने रशियाशी शस्त्रास्त्र व्यापार केल्यामुळे अमेरिकेच्या आंतरराष्ट्रीय सुरक्षा विभागाचे सहाय्यक संचालक ख्रिस्तोफर फोर्ड यांनी टर्की सैन्यदलाचा खरेदी विभाग आणि चार वरिष्ठ अधिकाऱ्यांना नोडतीस पाठवून निर्बंध लादल्याचे जाहीर केले.
अमेरिकेने टर्कीवर केलेल्या कारवाईपासून अन्य देशही बोध घेतील आणि रशियाशी शस्त्रास्त्र व्यापार करण्यापासून दूर राहतील अशी आम्हाला आशा वाटते. अन्यथा त्यांनाही अमेरिकेच्या निर्बंधांना सामोरे जावे लागेल, अशी तंबीही प्रशासनाने दिली आहे. भारतानेही सन २०१८ मध्ये रशियाकडून एस ४०० ही क्षेपणास्त्रविरोधी यंत्रणा आहे. अमेरिकेचा विरोध असूनही भारत सरकारने ५४३ कोटी रुपये देऊन हा व्यवहार पूर्ण केला आहे.